crime news Pudhari
बीड

धक्कादायक! दिव्यांगाने कुबडीने मारहाण करत एकाचा हात केला फ्रॅक्चर; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे

केज : एका दिव्यांगाने पैशाच्या कारणावरून हातातील लोखंडी कुबड्याने एकाला मारहाण करून त्याचा हात फ्रॅक्चर केल्याप्रकरणी त्याच्या दोन मुलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील खय्यूम दस्तगीर शेख याने मागील वर्षी त्यांचा गावातील सुखदेव देविदास राऊत यांच्याकडून हाताउसने पैसे घेतले होते. ते पैसे त्याने मागील सहा महिन्यापूर्वी परत दिले.

दरम्यान खय्यूम दस्तगीर शेख हे दि. २४ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास गावातील नागबेट चौकातील एका टपरीसमोर बसले होते. त्यावेळी सुखदेव राऊत तिथे आला आणि त्यांना पैशाची मागणी करू लागला. त्यावेळी खय्यूम त्याला म्हणाले की, तुमचे पैसे परत दिले आहेत. ते लक्षात नाही का ? असे म्हणताच सुखदेव राऊत याने त्यांना शिवीगाळ केली आणि त्याच्या हातातील लोखंडी कुबडीने खय्यूम यास मारहाण केली. त्यानंतर तिथे सोनू राऊत व भैय्या राऊत ही दोन मुले आणि त्यांनीही खय्यूम यास काठीने मारहाण केली.

या मारहाणीत खय्यूम यांच्या खांद्याला मार लागून फ्रॅक्चर झाला आहे. तसेच डोळ्यावर आणि हातावर मुका मार लागला आहे. खय्यूम शेख यांनी अंबाजोगाई येथे उपचार घेतल्यानंतर केज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सुखदेव राऊत आणि सोनू राऊत व भैय्या राऊत या तिघांच्या विरुद्ध गु. र. नं. १५६/२०२६ भा. न्या. सं. ११५(२), ११८(१), ११८(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT