केज :- केज तालुक्यातील युसुफवडव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सातेफळ येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून एका शेतकऱ्याने कांद्याच्या पिकात लावलेली अफूचे झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने कांद्याच्या पिकात लावलेले साडेतेरा किलो ग्रॅम वजनाची आणि बाजारात साडेपाच लाख रु. किंमत असलेली अफू यासह शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि.१७ फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकट राम यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस नाईक दिलीप गित्ते, पोलिस नाईक भागवत शेलार महेश जोगदंड, दीपक खांडेकर, गणेश मरांडे यांच्यासह युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे यांनी युसुफ वडगाव हद्दीत असलेल्या सातेफळ येथील घाडगे वस्ती जवळ कारवाई केली.
बन्सी घाडगे यांच्या शेतात कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याची गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्या वरून दुपारी ३:३० च्या सुमारास छापा मारला. त्यावेळी बन्सी महादेव घाडगे याने त्याच्या शेतातील कांद्याच्या पिकात लावलेले अफूची झाडे आढळून आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने, केज तहसीलचे नायब तहसीलदार अशोक भंडारे, महसूल मंडळ अधिकारी दयानंद मस्के, सहाय्यक कृषी अधिकारी गणेश पारखे, सहाय्यक कृषी अधिकारी सुदर्शन शेळके यांच्या समक्ष अफूची झाडे उपटून त्यांचे वजन केले असता त्याचे वजन साडेतेरा किलो ग्रॅम असल्याचे आढळून. त्याची बाजार किंमत साडेपाच लाख रु. एवढी आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेने अफूची लागवड करणारा शेतकरी बन्सी महादेव घाडगे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अफू हे मसाल्यात वापरीत असलेल्या खसखस या पदार्थाचे झाड असून अनेक शेतकऱ्यांना याला बंदी आहे या बाबत माहिती नसल्याने एक मसाल्याचे पदार्थ म्हणून काही झाडे लावली असल्याची चर्चा नाही. तसेच खसखस खुले आम बाजारात विकली जात असल्याने शेतकऱ्यांना त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही.