गौतम बचुटे
केज : केज तालुक्यातील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीतील पंजाबमधील मजुराचा केज येथील रोडवर मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकलेले नाही.
या बाबतची माहिती अशी की, आज (दि. १७) सकाळी ९:३० च्या सुमारास पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रचपाल हमीद मसीह या मस्साजोग येथील आवा दा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत ठेकेदार मार्फत कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील आवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत असलेला कामगार हा केज शहरातील केज-अंबाजोगाई रोडवर असलेल्या चांदणी बार समोर त्याचा मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने आणि बाळासाहेब अहंकारे यांना आदेश देवून घटनास्थळी रवाना केले.
केज पोलिसांनी रचपाल मसिह याचा हा मृतदेह करण्यासाठी ताब्यात घेवून उत्तरीय तपासणीसाठी केज उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र अद्याप पर्यंत त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास केज पोलीस करीत आहेत.