Beed Angry villagers protest for water immersion in the lake
गौतम बचुटे केज, पुढारी वृत्तसेवा : साठवण तलाव आणि इतर मागण्यासाठी सलग नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची सरकार दाखल घेत नसल्याने संतप्त आंदोलक आणि गावकऱ्यांनी गावा शेजारच्या एका तलावात उड्या घेऊन जलसमाधी आंदोलन केले.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान वतीने कोरडेवाडी येथे राजश्रीताई उमरे पाटील या बीड जिल्ह्यातील कोरडेवाडी तालुका केज येथे साठवण तलावासाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र द्यावे. अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार नुकसानभरपाई देण्यात यावी. ज्ञानराधा बँकेची स्थावर व जंगम मालमत्ता ताब्यात घेऊन त्याचा लिलाव करण्यात यावा. त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून ठेवीदारांचे पैसे तातडीने परत करण्यात यावेत. शेतकरी कर्जमाफी करण्यात यावी. शैक्षणिक फीस माफ करण्यात यावी. या त्यांच्या पाच प्रमुख मागण्यांसाठी ३ ऑक्टोबरपासून कोरडेवाडी येथे आमरण उपोषणाला बसल्या आहेत.
राजश्रीताई उमरे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस सुरू झालेला आहे. मात्र त्यांच्या उपो षणाची प्रशासनाने दखल घेतली नसल्याने ११ ऑक्टोबर रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि गावकरी यांनी टोकेवाडी रस्त्यालगत असलेल्या एका तलावात उड्या मारून जलसमाधी आंदोलन केले. या जलसमाधी आंदोलनात सुमारे शंभर स्त्री-पुरुष, आणि मुलेद 'खील सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. सुमारे अडीच तासांनंतर नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी धर्मवीर छत्रपती संभाज- ीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक बाळराजे आवारे पाटील आणि आंदोलकांची समजूत काढण्यात आली. त्यांच्या मागण्यांसंदर्भात मुंबई येथे सचिव पातळीवर कारवाई प्रस्तावित असल्याचे समजते.
जलसमाधी आंदोलनातील गोरख मारुती शिंदे आणि पप्पू शिंदे यांच्या नाका-तोंडात पाणी जाऊन ते पाण्यात बुडत अग्निशामक दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढले. उपचारासाठी त्या दोघांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलविले आहे.
प्रशासनाच्या वतीने आंदोलकांशी संपर्क साधून त्यांना जलसमाधी घेण्यापासून परावृत्त करण्यासाठी नायब तहसीलदार अशोक भंडारे आणि पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी स्वतः तलवात उतरून बाळराजे आवारे पाटील यांच्याशी संपर्क साधला.
दोन दिवसांनंतर जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आत्मदहन करण्याचा इशारा बाळराजे आवारे पाटील यांनी दिला आहे. काहीजण झाडावर चढले काही आंदोलक हे पाण्यात उतरलेले असताना काही आंदोलक हे झाडावरसुद्धा चढले होते.