Beed Accident | दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार तीन जखमी 
बीड

Beed Accident | दुचाकींची समोरासमोर धडक : एक ठार तीन जखमी

शेगाव पंढरपूर महामार्गा वरील सादोळा जवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव ; तालुक्यातून जात असलेल्या शेगाव पंढरपूर महामार्गा वरील सादोळा जवळील आबुजवाडी फाट्याजवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की कमलेश देविदास गायके(27) व मनोज साळुजी काटकर(35) दोघे राहणार वाहेगाव सोपारा हे सोमवारी दुपारी तीन वाजता धोतर जोडा आष्टी येथून माजलगाव कडे येत होते. यावेळी आबुजवाडी फाट्याजवळ रोड दुरुस्तीचे काम चालू असलेल्या ठिकाणी त्यांच्या मोटरसायकलची समोरून येत असलेल्या सुनील विश्वनाथ गायकवाड (25) विश्वनाथ काशिनाथ गायकवाड(50) रा. रायगव्हाण तालुका परतुर यांच्या मोटरसायकलशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात देविदास गायके हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचे जागेवरच निधन झाले तर त्यांचा सहकारी मनोज साळुजी काटकर रा. वाहेगाव सोपारा,व समोरील मोटरसायकल वरील पिता-पुत्र सुनील विश्वनाथ गायकवाड व विश्वनाथ काशिनाथ गायकवाड हे गंभीर जखमी झाले. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT