नगरसेवक दीपक मेंडके यांनी आपली बाजू मांडली 
बीड

Beed Accident : माजलगाव अपघातप्रकरणात मला जाणीवपूर्वक अडकवले जात आहे, भाजप नगरसेवक दीपक मेंडके यांचा आरोप!

अपघातावेळी माझा मुलगा गाडी चालवत नसल्याचा दावा

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : माजलगाव शहरालगत डक पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघात प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या अपघाताचा आणखी एक व्हिडिओ समोर आल्याने प्रकरणात खळबळ उडाली आहे. भाजपचे नगरसेवक दीपक मेंडके यांनी व्हिडिओ जारी करत आपल्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच अपघातावेळी प्रत्यक्षात वाहन कोण चालवत होते, याबाबत प्रश्न उपस्थित करत काही व्हिडिओ पत्रकारांसमोर सादर केले आहेत.

शुक्रवारी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास माजलगाव शहरातील डक पेट्रोल पंपाजवळ दोन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला होता. या दुर्घटनेत प्रल्हाद श्रीमंत गायकवाड आणि त्यांच्या पत्नी सुनीता प्रल्हाद गायकवाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण माजलगाव शहर हादरले होते.

या प्रकरणी भाजप नगरसेवक दीपक मेंडके यांचा मुलगा दक्ष मेंडके आणि अनुज संभाजी नाईकनवरे या दोघांविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गायकवाड कुटुंबीयांकडून संबंधितना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, आता नगरसेवक दीपक मेंडके यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे. यासोबतच अपघातावेळी वाहन अनुज नाईकनवरे चालवत होते, याबाबत दावा करत काही व्हिडिओ पत्रकारांना दिले आहेत.

नेमका चालक कोण? पोलिस तपासात काय समोर येणार?

या नव्या व्हिडिओमुळे अपघातावेळी वाहन चालवणारी व्यक्ती नेमकी कोण होती, गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची प्रत्यक्ष भूमिका काय होती आणि समोर आलेल्या व्हिडिओंची सत्यता काय, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT