अपघातात दुचाकीला फरफटत नेलेली बोरवेल गाडी. pudhari photo
बीड

Beed Accident : दुचाकीस्वाराच्या मृत्यू प्रकरणी बससह बोरवेल गाडी चालकांवर गुन्हा

Beed fatal accident: साळेगाव जवळ केज -कळंब रस्त्यावर घडली होती घटना

पुढारी वृत्तसेवा

Borewell truck accident Beed

केज : जळालेल्या अवस्थेत उभ्या बसला पाठीमागून धक्का बसून दुचाकी ही रस्त्यावर पडताच समोरून आलेल्या बोअरवेलच्या गाडीने दुचाकीला फरफटत नेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू होऊन त्याचा साथीदार जखमी झाल्याची घटना साळेगाव जवळ केज -कळंब रस्त्यावर घडली होती. या प्रकरणी बस आणि बोरवेल गाडी चालक या दोघा विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

माळेवाडी ता. केज येथील अशोक बबन हाके व त्याचा साथीदार गणेश कल्याण हाके हे दोघे ९ जून रोजी रात्री ७.३० ते ७.४५ वाजेच्या दरम्यान दुचाकीवर (एम एच ४४/ए बी-६२३४) बसून ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राची चैन तुटल्याने ही चैन आणण्यासाठी केजला आले. मात्र चैन न मिळाल्याने कळंबकडे निघालेले होते.

दरम्यान केज - कळंब रस्त्यावर साळेगाव शिवारात जळालेल्या अवस्थेत बस (एम एच- ११/बी एल- ९३७४) ही उभी होती. त्या ठिकाणी दिशादर्शक न लावल्याने समोरून आलेल्या वाहनांच्या हेड लाईटच्या तीव्र प्रकाश झोतामुळे अपघातग्रस्त बस दिसून न आल्याने त्यांच्या दुचाकीचा या बसला पाठीमागून धक्का बसला. ते दोघे दुचाकीसह रस्त्यावर पडताच समोरून भरधाव वेगात आलेल्या बोअरवेलच्या गाडीने (एम एच- १०/एस- ७९१६) त्यांना दुचाकीसह २०० मीटर फरफटत नेले.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अशोक हाके व गणेश हाके या दोघांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज हजारे यांनी तपासून अशोक हाके यास मृत घोषित केले. मयत अशोकचा भाऊ बाबुलाल बबन हाके यांनी दिलेल्या तक्रारी वरून एसटी बसचा चालक व बोअरवेल गाडीचा चालक या दोघांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार राकेश बनसोडे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT