अपहरण  file photo
बीड

बीड : १२ वर्षाच्या मुलाचे अपहरण; अज्ञातावर गुन्हा दाखल

केज तालुक्यातील घटना

पुढारी वृत्तसेवा

केज : सहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. अदित्य दत्तात्रय अनभुले (वय १२) असे या अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर मंगळवारी (दि.१८) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, केज तालुक्यातील ढाकेफळ येथील पूजा अनभुले यांचा १२ वर्षाचा मुलगा अदित्य अनभुले हा नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय अंबाजोगाई येथे इयत्ता सहावीत शिकत असून तो अंबाजोगाई येथील सारथी मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहतो. होळीच्या सणाला तो ढाकेफळ येथे घरी आला होता. त्यानंतर सोमवारी (दि.१७) सकाळी ८ वाजता तो शाळेत जाण्यासाठी गेला. हॉस्टेलला पोहचल्यावर त्याने फोन केला नाही, म्हणुन त्याच्या आईने दुपारी बाराच्या सुमारास हॉस्टेलमध्ये संपर्क केला. मात्र तो हॉस्टेलमध्ये आलाच नाही, असे हॉस्टेलमधून सांगण्यात आले. त्यानंतर नातेवाईकांनी हॉस्टेलसह परिसरातील अनेक भागात त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यानंतर पुजा अनभुले यांनी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात धाव घेत मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT