अपघातानंतर चकाचक करण्यात आलेला केज येथील टोलनाका Pudhari Photo
बीड

अपघातानंतर गुन्हा दाखल होताच एचपीएम कंपनीचे उघडले डोळे

केज टोलनाक्यावरील सर्व अडथळे हटविले

गौतम बचुटे

गौतम बचुटे, केज : केज येथील टोल नाक्यावर मातीचे ढिगारे आणि सिमेंट काँक्रीटचे मोठ-मोठे तुकडे रस्त्यावर पडल्याने अडथळा निर्माण झाला होता. या अडथळ्यांमुळे दोन दिवसांपूर्वी याच टोलनाक्यावर एक भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये चारचाकी अडथळ्यांना थडकून एकाच कुटुंबातील सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात दोन महिन्याच्या मुलीचा हात तुटला आहे. या धर्तीवर गुन्हा नोंद झाल्यानंतर एचपीएम कंपनीने टोलनाक्यावर स्वच्छता करुन सर्व अडथळे दुर केले आहेत. हेच काम जर आधी केले असते तर अपघात झाले नसते अशा प्रतिक्रिया स्थानिक आणि वाहनधारकांकडून येत आहेत.

या अपघातप्रकरणी पोलिसांनी एचपीएम कंपनीचे मालक मॅनेजर आणि अपघाताला जबाबदार असलेले यंत्रणा यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल केला होता. यानंतर कंपनीने तात्काळ टोल नाक्यावरील सर्व अडथळे हटविण्यात आले आहेत. तसेच टोल नाक्यावर सिग्नल यंत्रणा, सूचना फलक आणि प्रकाश योजना करण्यासाठी पोलीस निरिक्षक प्रशांत महाजन हे प्रयत्न करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT