बीड : गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास अटक pudhari photo
बीड

बीड : गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास अटक

बीड : गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्यास अटक

पुढारी वृत्तसेवा

बीड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील जालना रोड भागात एक तरुण गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार कारवाई करत शिव सुनील खोसे याला अटक करण्यात आली आहे.

बीड शहर व जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचे आदेश पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शेख उस्मान यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत आहेत. या दरम्यान पोलिस हवालदार अशोक दुबाले यांना माळीवेस भागात शिव खोसे हा गावठी कट्टा घेवून फिरत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोउपनि मुरकुटे यांनी पथकासह सदर इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली. जालना रोडवरील एका विअरबार समोर असल्याची माहिती मिळाली तेव्हा सापळा लावुन शिव सुनिल खोसे ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून एक गावठी बनावटीची पिस्टल व एक जिवंत राऊंडसह मिळुन आला आहे.

या प्रकरणी मनोज वाघ यांनी दिलेल्या फिर्याद वरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, तुळशिराम जगताप, अशोक दुबाले, कैलास ठोंबरे, मनोज वाघ, राहुल शिंदे, विकास वाघमारे, नारायण कोरडे, यांनी सहभाग घेतला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT