धोंडराई : गेवराईकडे तलवारी घेवून जात असताना एका पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.24) करण्यात आली. रतन देवराव पवार (वय.४३) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी आठ तलवारी जप्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, चकलांबा पोलीस अंतर्गत उमापूर दूरक्षेत्र येथे ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय माहिती मिळाली की, रतन पवार हा रिक्षामध्ये तलवारी घेऊन जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी गेवराईकडे जाताना रिक्षा क्रमांक (एमएच १६ ऐसी ४१६) या रिक्षाला अडवून तपास केल्यावर त्यामध्ये आठ तलवारी आढळल्या. पवार याला त्याचे परवाने बाबत विचारले असता परवाना नसल्याबाबत सांगितले. यावेळी तलवारी जागेस जप्त करून रिक्षा सह इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास चकलंबा पोलिस करत आहेत.