Beed Crime News pudhari photo
बीड

Beed Crime: प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून

नेकनूर पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती आली समोर

पुढारी वृत्तसेवा

नेकनुर ः नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अंजनवती येथील कामगार युवक अपघाताचा बनाव असलेल्या खुन प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू असल्याचा संशय असलेल्या या प्रकरणात सखोल तपासादरम्यान हा प्रकार खुनाचा असल्याचे निष्पन्न झाले .

दोन आरोपींना नेकनूर पोलिसांनी तळोजा पनवेल येथून ताब्यात घेतले यानंतर मात्र यातील काही धागे उलगडण्यात एपीआय मंगेश साळवे यांना यश आले असून आरोपी प्रियकराच्या मदतीने मयताच्या पत्नीचा खून करण्यात हात असल्याचे समोर आले आहे. तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सोमवारी न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंजनवती येथील कामगार युवक किरण बंडू सोनवणे याचा लिंबागणेश अंजनवती रस्त्यावर असलेल्या नाल्यात मृतदेह आढळून आला सुरुवातीला अपघाताचा बनाव दाखवण्यात आला मात्र गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने नेकनुर पोलिसांनी तपासाला गती देत तीन दिवसातच तळोजा, पनवेल येथून या प्रकरणातील आरोपी दशरथ परदेशी, धीरज येडे यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींताकडे करण्यात आलेली चौकशी, उपलब्ध तांत्रिक व परिस्थितीजन्य पुरावे, तसेच विविध साक्षीदारांचे जबाब यांच्या आधारे मयताची पत्नी प्रियांका सोनवणे (वय 25 वर्षे, रा. अंजनवती) हिचा सदर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

प्रियांका सोनवणे हिचे मुख्य आरोपीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातूनच पतीचा काटा काढण्यासाठी कट रचून त्याच्या खुनास मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसार प्रियांका सोनवणे हिला अटक करण्यात आलेली आहे. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींसह महिला आरोपीचा अधिक तपास करण्यासाठी न्यायालयाकडून तीन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी मिळाली असून, गुन्ह्याचे संपूर्ण षडयंत्र, इतर संबंधित पुरावे तसेच आरोपींच्या भूमिकेबाबत सखोल तपास एपीआय मंगेश साळवे करत आहेत. सोमवारी सायंकाळी केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांनी नेकनूर पोलीस स्टेशनला भेट देऊन तपासाचा आढावा घेत मार्गदर्शन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT