Beed Gambling Raid Pudhari
बीड

Beed Gambling Raid: चक्री जुगारावर अंभोरा पोलिसांची धडक कारवाई; तिघे ताब्यात

३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

कडा: अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीतील मराठवाडी (ता. आष्टी) येथे सुरू असलेल्या चक्री जुगारावर अंभोरा पोलिसांनी १ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३ वाजता धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून एकूण ३२,६९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ० ते ९ या आकड्यांवर पैसे लावून ‘चक्री’ नावाचा जुगार खेळत तसेच इतरांकडून खेळवून स्वतःचा फायदा करून घेत होते. छाप्यामध्ये रोख १२,००० रुपये तसेच एलसीडी, सीपीयू, माऊस, कीबोर्ड, चक्री चार्ट व इतर साहित्य असा एकूण २०,६९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अभिषेक हमपे, करण साबळे आणि अशपाक पठाण (सर्व रा. भिंगार, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे, चंद्रकांत तावरे, पोलीस हवालदार हरिभाऊ बांगर, पोलीस हवालदार सुखदेव बांगर आणि पोलीस शिपाई शिवदास केदार यांच्या पथकाने केली. या प्रकरणी फिर्यादी म्हणून पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे यांनी तक्रार दिली आहे.

अंभोरा पोलीस स्टेशनकडून अवैध धंद्यांविरोधात पुढेही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT