बीड ः आद्य कवी मुकुंदराज यांचे जन्मगाव असलेले बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई आता ‘पुस्तकांचे गाव’ होणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. आता अंबाजोगाईला पुस्तकांचे गाव करण्यासाठी साहित्यिक सरसावले असून नुकतेच एक चर्चासत्रदेखील या विषयावर पार पडले. पुढील वाटचालीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा राहणार आहे.
भिलार हे सातारा जिल्ह्यातील गाव 2017 मध्ये पुस्तकांचे गाव म्हणून नावारूपास आले. महाबळेश्वरच्या जवळ असल्याने या भागात पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. वाचन संस्कृती वाढावी, या उद्देशाने तत्कालीन मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून भिलार पुस्तकांचे गाव झाले.