Beed News : माजलगाव शहरात अतिक्रमणावर कारवाई  file photo
बीड

Beed News : माजलगाव शहरात अतिक्रमणावर कारवाई

महापुरुष स्मारक बचाव समितीच्या उपोषणाला यश

पुढारी वृत्तसेवा

Action against encroachments in Majalgaon city

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा माजलगाव शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर अखेर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महापुरुष स्मारक बचाव समितीचे सचिन कराळे व किशोर कानडे यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर माजलगाव नगरपालिका प्रशासन आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी दिलेल्या आश्वासनानुसार गुरुवारपासून शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. या पार्श्वभूमीवर महापुरुष स्मारक बचाव समितीने उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. उपोषणाची दखल घेत प्रशासनाने तातडीने कारवाईचे आश्वासन दिले होते. गुरुवारी सकाळपासून नगरपालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागांच्या मदतीने अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली.

यावेळी अनेक ठिकाणांवरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्यात आली. कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

उपोषणकर्ते व नागरिकांनी प्रशासनाने आश्वासनाची पूर्तता करण्यास सुरुवात केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, शहर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू ठेवावी आणि भविष्यात नव्याने अतिक्रमण होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. शहरातील या कारवाईचे स्वागत करत, अतिक्रमणमुक्त आणि सुबक माजलगावसाठी प्रशासनाने नियमितपणे अशा मोहिमा राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT