बीड, पुढारी वृत्तसेवा : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला विष्णू चाटे याला आता पोलिसांनी अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणी तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. आता विष्णू चाटे याला पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणातील अटकेतील संशयित आरोपींची संख्या ४ झाली आहे. तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आता पोलीस तपासाने वेग घेतला आहे. सीआयडीच्या पथकासह स्थानिक पोलीसदेखील या प्रकरणाचा तपास करत आहेत. यामुळेच या प्रकरणातील विष्णू चाटे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आता त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार असून त्याच्या चौकशीत या हत्यामागचे कारणदेखील समोर येऊ शकणार आहे.