dog's birthday
आडस येथे श्वानाचा वाढदिवस करण्यात आला 
बीड

बीडमध्ये श्वानाचा वाढदिवस थाटामाटात साजरा; शुभेच्छांचा वर्षाव !

दिनेश चोरगे

केज : बीड जिल्ह्यातील आडस येथे श्वान एक वर्षाचा झाल्याने त्याचा वाढदिवस सोमवारी (दि.८) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्नॅक्स असे या श्वानाचे नाव असून स्नॅक्सचा वाढदिवस साजरा करताना त्याच्यावर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच यानिमित्त पार्टी देखील आयोजित देखील करण्यात आले. आज-काल रस्त्यात आणि चौका-चौकात रस्त्यावर तर कधी बाईकवर केक कापून वाढदिवस साजरा करण्याचे फॅड तरूणांमध्ये दिसत आहे. मात्र बीड जिल्ह्यातील आडस (ता. केज) येथे कुटुंबातील सदस्याप्रमाणे असणाऱ्या स्नॅक्सचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यात आला.

जिल्ह्यातील आडस येथील नितीन ठाकूर हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्राबरोबरच बांधकाम व्यवसायातील एक प्रसिद्ध नाव आहे. ठाकूर सर यांना जसा मित्र आणि माणसे जोडण्याचा छंद आहे. अगदी तसाच त्यांना प्राण्यांचा देखील छंद आहे. त्यांनी घरी एक लॅब्राडोर जातीच्या श्वानाला सदस्याप्रमाणे संभाळले आहे. त्याचे नाव स्नॅक्स ठेवले असून त्याला खूप लाडात वाढविले आहे. ठाकूर कुटुंबात सर्वांचा लाडका असणाऱ्या स्नॅक्स एक वर्षाचा झाला असून सोमवारी (दि.८) त्याचा उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. स्नॅक्सच्या वाढदिवसा निमित्त त्याला शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले. तसेच स्नॅक्सचे औक्षण करून केक कापण्यात आला. तसेच माणसाच्या वाढदिवसासारखी पूर्ण घरात सजावट करून शोभेच्या फटाकेची आतिषबाजी करण्यात आली. तसेच गल्लीतील त्यांच्या सर्व मित्रमंडळी यांना बोलावून केक कापून वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा होत असून ठाकूर कुटुंब आणि त्यांची प्राणीमात्रावर असलेले प्रेम याची सर्वत्र चर्चा होत आहे. या निमित्त ठाकूर परिवाराने पार्टी देखील आयोजित केली होती.

SCROLL FOR NEXT