Graduate Constituency Election : पदवीधर निवडणुकीत बीड जिल्ह्यात ५९.६७ टक्के मतदान file photo
बीड

Graduate Constituency Election : पदवीधर निवडणुकीत बीड जिल्ह्यात ५९.६७ टक्के मतदान

गेवराईत सर्वाधिक ६८.१२ टक्के, तर पाटोदा तालुक्यात सर्वांत कमी ५०.४४ टक्के मतदान

पुढारी वृत्तसेवा

59.67 percent voter turnout in Beed district for the graduate constituency election

बीड, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी बीड जिल्ह्यात गुरुवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील एकूण ५७ हजार ६७२ नोंदणीकृत मतदारांपैकी ३४ हजार ४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दिवसअखेर जिल्ह्यात ५९.६७ टक्के मतदानाची नोंद झाली.

सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला मतदानाचा वेग संथ होता; मात्र दुपारनंतर मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन प्रक्रियेची पाहणी केली. प्रशासनाच्या नियोजनामुळे जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, गेवराईत सर्वाधिक ६८.१२ टक्के मतदान झाले.

माजलगावमध्ये ६४.३१, आष्टीत ६२.०९, परळ वैजनाथमध्ये ६१.४७, केजमध्ये ५७.८० बीडमध्ये ५७.४१, अंबाजोगाईत ५६.८३ वडवणीत ५६.७९, धारूरमध्ये ५५.४३ आणि शिरूर कासारमध्ये ५४.९७ टक्के मतदान झाले पाटोदा तालुक्यात सर्वांत कमी ५०.४४ टक् मतदानाची नोंद झाली. चोख पोलीस बंदोबस आणि निवडणूक कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुत जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही मतदान पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवारांत्र भवितव्य मतपेट्यांमध्ये बंद झाले असून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT