चकलांबा शिवारात वीज कोसळून ३ महिला ठार झाल्या. तर एक महिला जखमी झाली. File Photo
बीड

चकलांबा शिवारात वीज पडून ३ महिला ठार; एक जखमी

पुढारी वृत्तसेवा

गेवराई, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील चकलांबा शिवारात वीज कोसळून ३ महिला ठार झाल्या. तर एक महिला जखमी झाली आहे. ही घटना आज (दि.२६) सायंकाळी घडली. जखमी महिलेवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत महिलांची नावे

विजया राधाकिसन खेडकर (वय ४५), शालन शेषराव नजन (वय ५५), लंका हरिभाऊ नजन (वय ४२) अशी मृत महिलांची नावे आहेत. तर यमुनाबाई माणिक खेडकर या जखमी झाल्या आहेत.

सुरक्षित स्थळी जाण्यापूर्वीच वीज कोसळली

याबाबत अधिक माहिती अशी की, चकलांबा शिवारात काही महिला खुरपणीचे काम करत होत्या. यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाली. या महिला सुरक्षित स्थळी जाण्यापूर्वीच वीज कोसळल्याने यात तीन महिला ठार झाल्या. तर एक महिला जखमी झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT