बीड : तांत्रिक विद्याच्या आधारे पैशाचा पाऊस पाडत तुम्हाला ७० करोड रूपये देतो म्हणत २४ लाख रूपयांची फसवणूक प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ६ जणाविरोधात जादू टोना कायदा प्रतिबंधक कायदांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नगर रोड भागातील रहिवासी शेख अझहर शेख जाफर यांना आरोपी हामीद खान उर्फ बाबू करीम, जीलाने अब्दुल कादर सय्यद, सविता पवार, शेख समौर शेख अहेमद, उत्तम भागवत, प्रकाश गोरे हे विविध ठिकाणचे रहिवाशी असुन यांनी फिर्यादी शेख अझहर शेख जाफर यांना तांत्रिक विद्या अवगत असल्याचे सांगत तब्बल ७० करोड रूपयांचा पैशाचा पाऊस पाडुन देतो म्हणत तब्बल २४ लाख रूपयांची फसवणूक केली.
या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी शेख यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जादू टोना प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ४२०, १२०ब, ५०६ भांदवी सह कलम ३ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. पैशाच्या लोभापाई विज्ञान युगातही पैशाचा पाऊस पडण्याच्या आमिषाला बळी पडत २४ लाख रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणाचा शिवाजीनगर पोलीस तपास करत आहे.