पोलिस वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय दुचाकीस्वार ठार  
बीड

Beed Accident : पोलिस वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय दुचाकीस्वार ठार

गंगामसला येथील घटना

पुढारी वृत्तसेवा

माजलगाव : माजलगाव तालुक्यातील गंगामसला परिसरात पोलीस वाहनाच्या धडकेत २२ वर्षीय दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३०) घडली. यशवंत कीर्तनकार (रा. पुसेगाव, ता. सेनगाव, जि. हिंगोली) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक माणिक कांबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल तुंभार गावे हे पोलीस वाहनातून प्रवास करीत असताना गंगामसलाजवळ त्यांच्या वाहनाची मोटारसायकलची (क्र. MH 38 7653) समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार यशवंत कीर्तनकार गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला मदत केली. नागरिकांच्या सहकार्याने त्याला तातडीने माजलगाव येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पोलीस तपासानंतरच अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेत अवघ्या २२ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाल्याने गंगामसला परिसरासह पुसेगाव येथे शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT