दिंद्रुड : परळी तालुक्यातील कापूस व तुरीच्या शेतातून पोलिसांनी २१ किलो गांजासह एकाला ताब्यात घेतले. ही कारवाई आज (दि.१४) सकाळी ११ वाजता दिंद्रुड व अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या केली.
परळी तालुक्यातील नागपिंपरी येथील शेतकरी विश्वास नामदेव बडे यांनी आपल्या शेतात कापूस व तुरीच्या झाडात गांजाची 32 झाडे लावली होती. गोपनीय माहितीच्या आधारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक बारगड यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड व अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पडवळ यांनी नागपिंपरी येथे गुरुवारी सकाळी १०.०० वा छापा टाकत २१ किलो गांजा (किंमत ४१७४०० रुपये) जप्त करत आरोपी विश्वास बडे यांना ताब्यात घेतले. ही कारवाई बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहायक पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दिंद्रुड व अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी संयुक्तरित्या पार पडली. जप्त केलेला सर्व माल व आरोपी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांना स्वाधीन करण्यात आला आहे. ही कारवाई सपोनि अण्णाराव खोडेवाड, पो.हे.कॉं.श्रीपती चौरे, पो.कॉं.मुकेश शेळके, आत्माराम चामणर, महेश साळुंखे,पोटे यांनी केली.