मराठवाडा

बीड : साळेगाव येथे कारवर दगडफेक करून गणेशानंद महाराजांना जीवे मारण्याची धमकी

अविनाश सुतार

केज: पुढारी वृत्तसेवा: शांतीब्रह्म संस्थानचे मठाधिपती रामायणाचार्य हभप गणेशानंद महाराज जोगदंड यांच्या गाडीवर एका माथेफिरुने दगडफेक करून महाराजांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी संतोष गित्ते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे पुढील तपास करत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, साळेगाव (ता. केज) येथे एकनाथ महाराज यांच्या षष्ठीनिमित्त १० मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे. तसेच येथे एकनाथ महाराज यांच्या मंदिराचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेल्या परिसरात गणेशानंद महाराज हे माजी सरपंच नारायण लांडगे, हनुमंत ठोंबरे आणि संजय गित्ते यांच्यासोबत पाहणी करत होते. तसेच सप्ताहाच्या कार्यक्रमाचे नियोजन करत होते.

यावेळी संतोष धोंडीराम गित्ते या माथेफिरूने त्यांच्या उभ्या असलेल्या कारवर (एम एच-२५/आर आर-६८८०) दगडफेक केली. तसेच गणेशानंद महाराज आणि हनुमंत ठोंबरे यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

बॅनरवरच्या फोटोमुळे झाला वाद !

१० मार्च ते १७ मार्च दरम्यान नाथषष्ठीपूर्ती निमित सप्ताहाचे आयोजन केले आहे. याचे बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर लक्ष्मण ओव्हाळ यांचा फोटो आहे. त्यामुळे लक्ष्मण ओव्हाळ याचा फोटो का लावला? म्हणून संतोष धोंडीराम गीते याने दाऊ पिऊन मंदिरावर येवून शिवीगाळ केली. तसेच कारच्या चारही बाजूच्या सर्व काचा फोडून मोठे नुकसान केले.

– हभप. गणेशानंद जोगदंड महाराज शास्त्री, मठाधिपती, नित्यानंद शांतीब्रम्ह आश्रम, साळेगाव


हेही वाचा

SCROLL FOR NEXT