देवळाली, पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार भिमराव धोंडे, साहेबराव दरेकर यांनी एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध केली.
बाजार समिती निवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कडा बाजार समिती बिनविरोध झाली आाहे. यामध्ये आमदार सुरेश धस गटाला १२, माजी आमदार भिमराव धोंडे गट ३, राष्ट्रवादी आमदार आजबे व माजी आमदार दरेकर गट ३ या प्रमाणे जागावाटप करण्यात आले.
बाजार समिती संचालक म्हणून आमदार धस गटाचे रमजान तांबोळी, संजय बलभीम ढोबळे, अशोक मोहन पवार, रामशेठ बाळनाथ मधुरकर, वंदना परिवंत गायकवाड, बुवासाहेब सुभाष शेकडे, राजू मुरलीधर हुलगे, संजय कांतीलाल मेहेर, जयश्री तळेकर, शेंडगे रामदास भगवान, मुरलीधर फसले, छाया अशोक लगड, धोंडे गटाचे नामदेव आनंदराव धोंडे, अण्णासाहेब लांबडे, बेबीनंदा भगवान नागरगोजे तर आमदार आजबे व दरेकर गटाचे पंडित पोकळे, मधुकर सायंबर, राजेंद्र गव्हाणे यांची बिनविरोध निवड झाली आहे.