crime 
मराठवाडा

जालना : प्रवाशाच्या बॅगमधून ३ लाख ४८ हजारांचा ऐवज लंपास

backup backup

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : बसमधून प्रवास करत असताना प्रवाशाच्या बॅगेमधून १३ तोळे सोने व १७ हजार रुपये रोख रक्कम असा ३ लाख ४८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. अज्ञात दोन महिलांनी हा ऐवज लंपास केला असल्याचे बोलले जात आहे. ही घटना गुरूवारी (दि.२७) दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली. याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिकची माहिती अशी की, घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालय येथे प्राध्यापक आहेत. बालाजी श्रीकिसन गार्डी (वय ५० रा. पाटीलगल्ली वडवणी) हे दिवाळीचा सण आवरून आपल्या परिवारासोबत बीडहून अंबडकडे प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान अज्ञात दोन महिलांनी त्यांच्या बॅगमधून सोने व रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना बसमध्ये महाकाळा येथे घडली. अज्ञात चोरट्यांनी १३ तोळे २ ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख १७ हजार रुपये असा ३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून बालाजी गार्डी यांच्या फिर्यादी वरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT