मराठवाडा

बीड : मांगवडगाव पेट्रोल पंपाजवळ अपघात; दोघे जखमी

backup backup

बीड, पुढारी वृत्तसेवा : केज-कळंब रोडवर मांगवडगाव फाट्या जवळील पेट्रोल पंपा जवळ दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. यानंतर दुचाकी एका टँकरवर जाऊन आदळली. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि.१९) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. राहुल मुसळे (रा. धारूर) व संतोष काळे (रा. निलंगा) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळताच केज येथील १०८ रुग्णवाहिकेचे पायलट उमेश हंगे आणि सोबत डॉ. ऋतुजा मोटे या तात्काळ अपघातस्थळी दाखल झाले. दरम्यान, खासगी वाहनांतून कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT