आष्टी; पुढारी वृत्तसेवा : आष्टी तालुक्यात मंगळवारी (दि. ४) पुन्हा एकदा बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली. या बिबट्याच्या पिल्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे.
आष्टी तालुक्यातील पांगरा गावात तीन दिवसांपूर्वी एक बिबट्या विहीरीत पडला होता. वनविभागाच्या पथकाने त्याला बाहेर काढताच त्याने पळ काढला होता. यानंतर मंगळवारी (दि. ४) सुलेमान देवळा शिवारातील एका विहीरीत बिबट्याचे साधारण आठ महिन्याचे पिल्लु एका विहीरीत आढळून आले होते. वन विभागाच्या पथकाने त्याला विहीरीबाहेर काढून पिंजऱ्यात ठेवले आहे. त्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शाम सिरसट यांनी दिली.