मराठवाडा

बीड: अंगावर विज पडून १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू

अमृता चौगुले

वडवणी(बीड), पुढारी वृत्‍तसेवा : वडवणी तालुक्यातील सत्तेवाडी या ठिकाणी आज सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान १४ वर्षीय शाळकरी मुलीचा सीताफळ तोडताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. या घटनेने देवळा परिसरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मराज पवार यांची मुलगी सिमा पवार ही देवळा येथील दयानंद विद्यालयात ८ वीच्या वर्गात शिकत होती. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर स्वत:च्या शेतामध्ये कांदा लावण्यासाठी गेली होती. सर्व कुटुंबासोबत कांद्याचे रोप लावून झाल्यावर सिमा पवार ही सीताफळ तोडण्यासाठी शेताच्या थोडी बाजूला गेली.

दरम्‍यान, पाऊस नव्हता केवळ ढगांचा गडगडाट सुरू होता. सिताफळ तोडत असतांनाच अंगावर विज कोसळली व विजेच्या धक्क्यातच तीचा जागीच मृत्यु झाला. धर्मराज पवार यांना एक मुलगा व सिमा ही एकुलती एक मुलगी होती. घरातील एकुलती एक मुलगी गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेने देवळा परिसरात व वडवणी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT