मराठवाडा

लातूर : कत्तीने गळा कापून शिक्षक पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या

दिनेश चोरगे

अहमदपूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील राजसारथी कॉलनीत राहत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने चारित्र्यावर संशय घेऊन आपल्या पत्नीची धारदार कत्तीने वार करून व उकळलेले तेल अंगावर टाकून निर्घृण हत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील हालसी येथील रहिवासी असलेले व सध्या जिल्हा परिषद प्रशाला खंडाळी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले वैजनाथ दत्तात्रय सूर्यवंशी (वय – ४३ वर्ष) त्यांची पत्नी शामल वय ३७ वर्ष व अकरा व नऊ वर्ष वयाच्या दोन मुलींसह राहत असत. २०११ साली परभणी जिल्ह्यातून बदलीने अहमदपूर येथे आल्याने मुलाबाळांसह भाड्याचे घर घेऊन ते राहत होते. नुकतीच प्रशासकीय कारणास्तव निलंगा तालुक्यात बदली झाली असून घरात पसारा घेऊन जाण्याच्या तयारीत हे कुटुंब असताना १३ मे च्या रात्री वैजनाथ सूर्यवंशी यांने आपल्या पत्नीवर धारदार कत्तीने गळ्यावर, हनुवटीवर व हातावर वार करून व अंगावर उकळते तेल टाकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक व सुन्न करणारी घटना घडली आहे. मृताचा भाऊ मनोज प्रभाकर ढोले (वय २४ वर्ष) रा. श्रीमाळी ता. भालकी, जि. बिदर यांच्या फिर्यादीवरून तक्रार नोंद विण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT