मराठवाडा

ST : तब्बल ३३ दिवसानंतर जिंतूर आगारातून २ बसेस धावल्या

backup backup

जिंतूर, पुढारी ऑनलाईन

आज तब्बल ३३ दिवसानंतर जिंतूर आगारातून आज दुपारी ३ आणि ३.३० वाजण्याच्या दरम्यान एका मागे एक असे दोन बसेस (ST) जिंतूर आगाराच्या जिंतूर ते परभणीसाठी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आल्या.

जिंतूर आगारातील एक चालक (९९०४) जमगुंडे आणि एक वाहक (२२५१) वाकडे हे दोघे रूजू झाले असून या दोघांनी ८६४३ क्रमांकाची बस काढून परभणी फेरी साठी ३ वाजता निघाले यांच्या पाठोपाठ वाहान पर्यवेक्षक अन्सारी यांनी ही ६९२१ क्रमांकांची बस घेऊन परभणी फेरी साठी निघाले.

३३ दिवसाच्या संपानंतर आज रस्त्यावर बस (ST) धावतांना लोकांनी पाहिले अजून ही काही कर्मचारी कामावर परत येण्यास तयार असले तरी खोडीलपणा करणारे काही कर्मचारी त्या कर्मचारऱ्यांवर दबाव आणत आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्यास ही संपाची कोंडी फुटू शकेल.

जिंतूर आगारातील चालक, वहाक २५० हून अधिक गेल्या ३३ दिवसांपासून संपावर असून एक चालक व एक वहाक यांनी हजर होण्याचे धाडस केले. त्यांचे धाडस कायम ठेवण्यासाठी त्यांना संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. जिंतूर आगारातील १८ चालक व २० वहाक निलंबित करण्यात आले आहेत.

हे क्राईम स्टोरीज वाचल्या का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT