मराठवाडा

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती मृत्यू

मोहन कारंडे

बिलोली; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर हायवेवर सोलापूर पासून ४० किलोमीटर अंतरावर माळवत-चिखली या गावाजवळ शनिवारी (दि.१) रात्री ११ वाजेच्या सुमारास कार व ट्रकचा अपघात झाला. या अपघातात नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव जमनाजी एंबडवार (वय ७२) रा. कोल्हेबोरगाव यांचा मृत्यू झाला.

बाबाराव एंबडवार हे आपल्या मुलाला पुणे येथे भेटण्यासाठी कारने जात होते. पुणे- सोलापूर हायवेवर माळवत-चिखली या गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर कार धडकली. अपघात घडल्यानंतर जवळपास दीड तास मदत मिळू शकली नाही. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आले. यामध्ये एंबडवार यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक करीमखान पठाण व रामचंद्र मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

बाबाराव एंबडवार यांचा राजकीय प्रवास

एंबडवार हे कोल्हेबोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे १२ वर्ष सभापती, बिलोली पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे दोन वेळा उपाध्यक्ष, आरोग्य व शिक्षण सभापती ते शिवसेना पक्षाकडून जिल्हा परिषदेचे दोन वेळेस अध्यक्षपद असा त्यांचा राजकीय प्रवास होता. तालुक्यातील आरळी जिल्हा परिषद गटातून पाच वेळेस ते सदस्य म्हणून निवडून आले होते. एक वेळेस आरळी जिल्हा परिषदमधून बिनविरोध सदस्य म्हणूनही निवडून आले. चेतना शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT