परभणी;पुढरी वृत्तसेवा : मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम राजगोपालचारी उद्यान येथे संपन्न झाल्यानंतर राजगोपालचारी उद्यान येथील नवीन 40 मीटर उंच झेंड्याचे अनावरण मंत्री सहकार, इतर मागास बहुजन कल्याण अतुल सावे यांच्या हस्ते संपन्न झाले. नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत या ध्वजाची उभारणी राजगोपालच्या उद्यान येथे करण्यात आली. शहराच्या सौंदर्यात भर करणाऱ्या अजून एक कलाकृती महानगरपालिकेतर्फे उभारण्यात आली.
यावेळी मा. खासदार संजय जाधव मा. आमदार राहुल पाटील, मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक आर. रागसुधा, महानगरपालिका आयुक्त तृप्ती सांडभोर, अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपायुक्त जयवंत सोनवणे, मनोज गगड, व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.