आटपाडी | सांगली: आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. यु. टी. जाधव हे 1177 मतांनी विजयी झाले असून, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख आणि माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांच्या पाठिंब्याने हा विजय मिळवण्यात आला. या निकालानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांनी उमेदवारांसह विजयाचा आनंद साजरा केला.
सेलूच्या नगराध्यक्षपदी भाजपाचे मिलिंद सावंत 217 मतांनी विजयी घोषित, प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून फेर मतमोजणीची मागणी
मानवत नगरपालिका निवडणुकीत पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राणी अंकुश लाड 3352 मतांनी आघाडीवर
पाथरीत काँग्रेसचे जुनेद खान दुरानी आघाडीवर
पूर्णा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रेमला एकलारे 406 मतांनी आघाडीवर
जळगाव जिल्ह्यामधील सर्वाधिक हॉट सीट असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील व भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पक्षाच्या उमेदवारांवरमध्ये लढत होती. तिसऱ्या फेरी अखेर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सुकन्या संजना चंद्रकांत पाटील 1917 मतांनी आघाडीवर आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंना या ठिकाणी धक्का मानला जात आहे
योगेश पाटील शिंदे शिवसेना 4354
रवींद्र घोडेस्वार राष्ट्रवादी अजित पवार 1366
प्रवीण नाईक ठाकरे सेना 3626
शिंदे शिवसेना योगेश पाटील 728 मतांनी आघाडीवर
पहिल्या फेरीची फायनल आकडेवारी
राष्ट्रवादी अजित पवार गट: विठ्ठल अशोक उगले 3853
भाजप: हेमंत विठ्ठल वाजे 1388
शिवसेना उ बा ठा: प्रमोद चोथवे 2755
शिवसेना शिंदे गट :नामदेव लोंढे 1869
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे समर्थक उमेदवार विठ्ठल उगले 1098 मतांनी आघाडीवर
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक - 2025
प्रभाग क्रमांक - 1 अ - मनिषा सुरेंद्र बाविस्कर - (शिवसेना शिंदेगट विजयी)
1- ब बारावकर किशोर गुणवंत (शिवसेना शिंदेगट विजयी)
प्रभाग क्रमांक 2- अ - गोहील संजय नाथालाल (शिवसेना शिंदेगट विजयी)
2- ब - चौधरी वैशाली छोटुलाल (शिवसेना शिंदेगट विजयी)
प्रभागा क्रमांक 3- अ कविता विनोद पाटील (भाजपा विजयी)
3- ब सतिष पुंडलिक चेडे (शिवसेना शिंदेगट (विजयी)
पहिल्या फेरी अखेर - नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनिता किशोर पाटील (शिवसेना शिंदेगट) 1759 मतांनी पुढे...
शिवसेना शिंदे गट - 7 जागा विजयी, भाजपा - 1 जागा विजयी.
छत्रपती संभाजीनगर नगराध्यक्ष...
एकूण जागा : 7
सिल्लोड : शिवसेनाचे समीर सत्तार आघाडीवर
कन्नड : काँग्रेस चे शेख फरीन आघाडीवर
पैठण : उबठाच्या अपर्णा गोर्डे आघाडीवर
गंगापूर : भाजपचे प्रदीप पाटील आघाडीवर
खुलताबाद : भाजप परशराम बारगळ आघाडीवर
वैजापूर : भाजपाचे उमेदवार दिनेश परदेशी आघाडीवर
शिंदे सेनेचे संजय बोरणारे पिछाडीवर
फुलंब्री ( पंचायत ) : ubt राजेंद्र ठोंबरे आघाडीवर
नंदुरबार - नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीने आता गती घेतली असून प्रभाग क्रमांक एक मधील एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार कुणाल वसावे आणि सौ ज्योती राजपूत या विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये सुद्धा शिंदे घटाने दोन जागा जिंकले असून दीपक कटारिया आणि सौ टीना ठाकूर विजय घोषित करण्यात आले आहे. यामुळे एकनाथराव शिंदे गटाने पहिले खाते उघडले आहे. दरम्यान नगराध्यक्ष पदाच्या शिंदे गटाच्या उमेदवार सौ रत्ना रघुवंशी यांनी आतापर्यंतच्या मतमोजणीत आघाडी घेतली आहे. नंदुरबार येथे भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली होती. याचबरोबर तळोदा येथे सुद्धा शिंदे गटाच्या शिवसेनेने खाते उघडले आहे.
सांगली जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतींसाठी मतमोजणीला सुरुवात झालीये. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा आणि जत या नगर परिषदेच्या तर शिराळा आणि आटपाडी येथील नगरपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीन मधील मतमोजणीला सुरुवात सुरुवात करण्यात आली.
निकाल जाहीर होण्यापूर्वीच चाळीसगाव शहरात विजयाचे बॅनर झळकले आहेत. भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांच्या विजयाचे शुभेच्छा देणारे बॅनर छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आले आहेत. निकालापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे.
आज होणाऱ्या नगरपालिका निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, बाईक रॅली आणि डॉल्बी लावण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. निकालानंतर कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे.
288 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार असून, दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या निकालातून नगरपरिषदेतील सत्तासमीकरणे ठरणार आहेत. अनेक उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे. गेल्या 19 दिवसांपासून उमेदवार, कार्यकर्ते तसेच नागरिक निकालाची उत्सुकतेने वाट पाहत होते. आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होत आहे.
या निवडणुकीच्या निकालावर राज्यातील महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्याही निवडणुकीचा निकाल अवलंबून असल्यामुळे या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अपेक्षित विजयी उमेदवार आणि राजकीय पक्षांनी गुलाल आणि ढोल-ताशांची जोरदार तयारी केली आहे. निकाल लागताच गुलालाची उधळण केली जाणार आहे.