Mumbai Marin Drive During Monsoon Season Deepak Salvi/Pudhari
महाराष्ट्र

Monsoon 2025: रविवारपासून पुढचे सहा दिवस राज्यात पुन्हा पावसाचा जोर, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Monsoon Alert: 10 जून पासून मान्सूनचा मुक्काम मुंबई,पुण्यातून संपवून तो राज्यातील इतर भागात जाईल असा अंदाज आहे.

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Yellow Alert Monsoon June 2025

पुणे : राज्यातील पाऊस वाढतच असून 8 ते 13 जून या सहा दिवसांच्या कालावधित बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान 10 जून पासून मान्सूनचा मुक्काम मुंबई,पुण्यातून संपवून तो राज्यातील इतर भागात जाईल असा अंदाज आहे.

हवामान विभागाने 9 जून पर्यंत राज्यीतल बहुतांश भागाला यलो अलर्ट देत पुढे दोन दिवस पाऊस थांबणार असल्याचा अंदाज दिला होता. मात्र 9 ते 13 जून असा चार दिवस पावसाचा मुक्काम वाढला आहे.

असा पडेल विभागवार पाऊस.. (कंसात जून मधील तारखा)

कोकणः (8,9,12,13)

मध्य व उत्तर महाराष्ट्रः (8 ते 13 )

मराठवाडा : (8 ते 11)

विदर्भः (8 ते 13 जून)

जिल्हावार यलो अलर्टः (कंसात तारखा)

रायगड (8), रत्नागिरी (8),अहिल्यानगर (8), पुणे (8), सातारा (8), सांगली (9), सोलापूर (8 ते 13 जून), छ.संभाजीनगर (8), जालना (8), बीड (8,10), हिंगोली (8), नांदेड (8,9), लातूर (9,12), धाराशिव (9 ते 11), अकोला (8 ते 10), अमरवती (8 ते 10),बुलडाणा (7 ते 9), गडचिरोली (7 ते 9), वर्धा (7 ते 9), वर्धा (7 ते 9),वाशिम (8,10), यवतमाळ (8 ते 10)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT