कोल्हापूर

श्रीराम पचिंद्रे : अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड

रणजित गायकवाड

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा द्वारे दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव शाखा आयोजित दुसरे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन ऑनलाईन प्रणालीद्वारे २५ जुलै २०२१ रोजी होत आहे. हे साहित्य संमेलन सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार व शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत करणार आहेत.

स्वागताध्यक्ष पद साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शरद गोरे भूषिवणार आहेत. तर निमंत्रक साहित्य परिषदेचे कर्नाटक राज्य अध्यक्ष रवींद्र पाटील आहेत.

गेल्यावर्षी बेळगावमध्ये मराठा मंदिरमध्ये संपन्न झालेल्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद सुप्रसिद्ध साहित्यिक रामदास फुटाणे यांनी भूषिवले होते.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दुसरे साहित्य संमेलन दूर दृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आले आहे.

२५ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. त्या नंतर सुप्रसिद्ध कवी आनंदकुमार शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे.

साहित्यिक व पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांची एकूण पंधरा पुस्तके प्रकाशित आहेत.

१) फुलोरा
२) पत्रे सुरेश भटांची
३) भ्रष्टासुराच्या कथा- दोन आवृत्त्या.
४) सूर्यपंख- दोन आवृत्त्या.
५) मुलाखत आणि शब्दांकन- तीन आवृत्त्या.
६) लक्ष्यवेध- दोन आवृत्त्या.
७) रंग मैफलीचा
८) वाट इतकी सरळ
९) शाहू- सहा आवृत्त्या.
१०) नेताजी सुभाष: राजकीय जीवनगाथा- तीन आवृत्त्या.
११) अवीट गाणी
१२) मृगजळ मागे पाणी
१३) Shahu: The Reformer- चार आवृत्त्या.
१४) आभाळाचे पंख निळे
१५) नक्षत्रांच्या ओळी- संपादित- तीन आवृत्त्या.

अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहात कविता आणि गझलांचा समावेश.

'पुढारी' सह विविध  २५ दिवाळी अंकांचे संपादन.

पाचशे वृत्तपत्रीय लेख प्रसिद्ध.

'झंकार चांदण्याचा' ही गाण्यांची मैफल.

तीस पुरस्कार प्राप्त

बालभारती मराठी पाचवीच्या पुस्तकात 'शाहू' कादंबरीतील पाठ समाविष्ट.

'शाहू' कादंबरीवर तीन प्राध्यापकांची एम. फिल.

दहा राष्ट्रीय परिषदांत सहभाग.

राज्य पातळीवरील वीस साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद.

राज्य पातळीवरील वीस कविसंमेलनांचे अध्यक्षपद.

पाच हजारांहून अधिक व्याख्याने.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT