कोल्हापूर

विधान परिषद निवडणूक : इचलकरंजीत नगरसेवकांच्या पालकमंत्र्यांकडून गाठीभेटी

अमृता चौगुले

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषद निवडणूक मध्ये इचलकरंजी शहरातील 80 टक्के मतदार नगरसेवक आपल्याबरोबर असल्याचा दावा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केला. सकाळपासून महाविकास आघाडीच्या सर्वच नगरसेवक मतदारांशी भेटीगाठी घेत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, ना. पाटील ( विधान परिषद निवडणूक ) यांनी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवासस्थानी भेट घेतली. इचलकरंजी पालिकेमध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेले अनेक नगरसेवक सध्या आ. प्रकाश आवाडे यांच्याबरोबर असल्याबाबत पाटील यांना छेडले असता त्यातील बहुतांशी नगरसेवकांनी आपणास पाठिंबा देण्याचे कबूल केल्याचे पाटील म्हणाले. इचलकरंजी शहरातील मुख्य पाणी प्रश्न आहे. तो सोडविण्याबरोबरच कचर्‍याची समस्या कायमची सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

आज शिरोळ, हातकणंगलेचा दौरा ( विधान परिषद निवडणूक )

शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ, जयसिंगपूर आदी नगरपालिकेतील नगरसेवकांची रविवारी भेट घेणार आहे. तसेच, हातकणंगले तालुक्यातील नगरपालिका सदस्यांशी चर्चा करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

यावेळी आ. राजू आवळे, मदन कारंडे, माजी आमदार राजीव आवळे, नगरसेवक सागर चाळके, रवींद्र माने, प्रकाश मोरबाळे, शशांक बावचकर, संजय कांबळे, राहुल खंजिरे, विठ्ठल चोपडे, महादेव गौड, नितीन जांभळे, अब—ाहम आवळे उपस्थित होते.

दरम्यान, ना. पाटील यांनी इचलकरंजी शहर शिवसेना कार्यालयास भेट दिली. याप्रसंगी खासदार धैर्यशील माने, नगरसेवक रवींद्र माने, महादेव गौड, सयाजी चव्हाण आदी उपस्थित होते.

कल्लाप्पाण्णा आवाडे यांची भेट ( विधान परिषद निवडणूक )

पालकमंत्री पाटील यांनी सायंकाळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. आ. आवाडे परगावी गेले असून निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा करावी व निर्णय घ्यावा, असे कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी सांगितले. यावेळी स्वप्निल आवाडे, उत्तम आवाडे आदी उपस्थित होते.

यड्रावकर आमच्यासोबतच ( विधान परिषद निवडणूक )

राजेंद्र पाटील-यड्रावकर हे महाविकास आघाडीचे मंत्री असून ते गोकुळ, जिल्हा बँक निवडणुकीत आमच्याबरोबर आहेत. या निवडणुकीतही त्यांची साथ आम्हाला कायम राहणार आहे. विरोधकांकडून अफवा पसरवल्या जात असल्या तरी आघाडी एकसंघ आहे. शिरोळ तालुक्यातील गणपतराव पाटील व राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा झाली असून तेथे स्थानिक वादाबाबत लवकरच मी व मंत्री हसन मुश्रीफ सकारात्मक मार्ग काढू.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT