कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूरमार्फत कात्यायणी मंदिर, सांगवडे येथील श्री नृसिंह मंदिर तसेच शहरातील विविध गरजूंना आ. जयश्री जाधव यांच्या हस्ते व्हिल चेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीचे उदय दीक्षित, संजय जाधव, महेश ढवळे, कविता गगराणी, बाबा जांभळे, अनुप पाटील, वसंतराव जांभळे, अॅड. सचिन रावळ यांच्यासह पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
आमदार जाधव यांनी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या उपक्रमाचे कौतुक करून समाज विकासात मोलाचे योगदान असल्याचे स्पष्ट केले. जाधव इंडस्ट्रिज, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी यांच्या वतीने महालक्ष्मी मंदिर परिसरात टॉयलेट प्रोजेक्ट उपक्रम राबविण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. यावेळी आ. जाधव यांचा सत्कार करण्यात आला.