कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ जिल्ह्यात एक नंबरवर येईल : आ. हसन मुश्रीफ

Arun Patil

पट्टणकोडोली, पुढारी वृत्तेसवा : कार्यकर्ते मतदारांच्या घराघरात पोहोचले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळच जिल्ह्यात एक नंबरवर येईल, असे प्रतिपादन माजी मंत्री, आ. हसन मुश्रीफ यांनी केले. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रबोधन मेळाव्यात ते बालत होते.

यावेळी पट्टणकोडोली येथे विविध विकासकामे पूर्ण केल्यानिमित्त मुश्रीफ यांचा नागरी सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष शिरीष देसाई, बी. एस. माळी, तालुका उपाध्यक्ष परशराम कीर्तिकर, शहराध्यक्ष इरफान जमादार यांनी केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासो गाट होते.

मेळाव्यास तालुकाध्यक्ष संभाजी पोवार, माजी आमदार राजीव आवळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप माने, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, उद्योजक अमित गाताडे आदी

उपस्थित होते. यावेळी 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या सानिका जाधवचा सत्कार करण्यात आला. प्रकाश बोंगाळे यांनी आभार मानले. प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT