कोल्हापूर

‘राजा-राणीची गं जोडी’ येतेय भेटीला

backup backup

'राजा-राणीची गं जोडी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले संजू आणि रणजित यांनी अल्पावधीत छोटा पडदा गाजवत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्लड स्वभावाची संजू शिस्तप्रिय रणजित यांच्या राजा-राणीच्या प्रेमाची कथा रंगवताना महिला सबलीकरणाचा, कुटुंबवत्सल स्त्रीत्वाचा संदेश देणारी ही जोडी ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब आणि कलर्स मराठीच्या वतीने रविवारी (दि.22) सायंकाळी 5 वाजता 'कलरफुल संडे' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. @pudharionline / @pudharikasturi या फेसबुक पेजच्या माध्यमातून कलाकार शिवानी आणि मणिराज यांच्याशी दिलखुलास गप्पा मारता येणार आहेत. ढाले-पाटलांच्या घरातून अर्पणाची हकालपट्टी झाल्यानंतर कुसूमावती आणि संजूचं नातं सुधारेल?

पुढे मालिकेमध्ये काय घडणार आहे, हे जाणून घेण्याची संधी कार्यक्रमात मिळणार आहे. 'राजा-राणीची गं जोडी' मालिकेमध्ये अखेर अर्पणाची हकालपट्टी होणार असून, अर्पणा आणि राजश्रीचे कारस्थान सर्वांसमोर उघड होणार आहे. सुजितला अर्पणासोबतच्या जबरदस्तीच्या नात्यातून संजू आणि रणजित मुक्त करणार आहेत. पुढील आठवड्यात श्रावण सोमवारी असलेल्या पूजेत या नाट्यावरील पडदा उठणार असून, यानंतर कुसुमावती आणि संजू यांच्यातील नाते सुधारेल? याची उत्तरे कार्यक्रमात मिळणार आहेत.

दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब सभासद नोंदणी सुरू

मनोरंजन, सेलिब्रिटी, गप्पा-टप्पा, रेसिपी शो, सहल, नाटक विविध प्रशिक्षण अशा कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी आजच कस्तुरी क्लबचे सभासद व्हा..!

सभासद नोंदणी फी 600 रुपये असून, हमखास गिफ्ट मॅजिक स्पिन मॉप आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : कोल्हापूर : 8483926989, सांगली : 9607957576, सातारा : 9762527109, गडहिंग्लज : 9423539561, इस्लामपूर : 8308706122, कराड : 8796471210.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT