कोल्हापूर

मिम्ससाठी उत्तम सेन्स, निरीक्षण कौशल्य हवे

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मिम्ससाठी उत्तम सेन्स हवा, तसेच निरीक्षण कौशल्य असायला पाहिजे. तरच उत्तम प्रकारचे मिम्स तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन अभिनेता, कंटेंट क्रिएटर सुमित पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या पी. जी. डिप्लोमा इन ऑनलाईन जर्नालिझमच्या वर्गाच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, डॉ. सुमेधा साळुंखे, अभिजीत गुजर, मतीन शेख, शेखर पाटील उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मिम्सचा उद्देश मनोरंजन आहे. परंतु, त्याच्या पलीकडे जात अलीकडे प्रमोशन्स व जाहिरातींसाठी मिम्सचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. त्यामुळे यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. विविध कंपन्यांमध्ये मिम मेकर असे पद असते. म्हणून विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. मिम्स तयार करण्यासोबतच आशय निर्मिती खूप महत्त्वाची आहे. वैविध्यपूर्ण आशय निर्माण करता आला पाहिजे. त्यासाठी वाचन, अनुभवजन्य ज्ञान आणि निरीक्षण कौशल्य असायला पाहिजे. शिवाय ताज्या घडामोडी व अवतीभोवती घडणार्‍या घटनांची बारकाईने नोंद ठेवली पाहिजे. अभिनयाबरोबरच संपादन कौशल्यही शिकून घेतले पाहिजे. प्रेक्षकांच्या आवडी-निवडी आणि विविध माध्यमांचे तांत्रिक ज्ञान समजून घेतले पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी करण शिंदे याने पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रणाली पाटील हिने आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT