कोल्हापूर

‘महाराजा ट्रॅव्हल्स’च्या ट्रेडमार्क, लोगोचा परस्पर वापर; चौघांवर गुन्हा

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा अधिकृत ट्रेडमार्क, लोगोसह नावाचा किंबहुना ट्रॅव्हल्सच्या ई- मेल आयडीचा गैरवापर करून कंपनीसह प्रवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी नॅशनल आणि पवन ट्रॅव्हल्सच्या कोल्हापूर व सांगलीतील चौघांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यात 'पवन' च्या व्यवस्थापकाचा समावेश आहे. महाराजा ट्रॅव्हलिंग कंपनी आपली सेवा असल्याचे ग्राहकांना भासविण्याचा प्रयत्न संशयितांनी केल्याचे म्हटले आहे.

सांगली येथील नॅशनल टूरिस्टचा हनिफ राऊतर (रा. सांगली), पवन ट्रॅव्हल्सचा व्यवस्थापक संदीप इंगळे (रा. महालक्ष्मी चेंबर्स, मध्यवर्ती बसस्थानकासमोर कोल्हापूर, परवेझ हनिफ राऊतर (महालक्ष्मी चेंबर्स, कोल्हापूर), मनोज चौगुले (पवन ट्रॅव्हल्स, महालक्ष्मी चेंबर्स, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयितांना रात्री उशिरापर्यंत अटक झालेली नव्हती. सुनील सुधाकर खोत (रा.कोल्हापूर) यांनी संशयिताविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. डिसेंबर 2020 पासून आजअखेर हा प्रकार सुरू होता, असेही म्हटले आहे.

फसवणूकप्रकरणी चारही संशयितांना लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी सांगितले. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, व्यवस्थापक संदीप इंगळेसह हनिफ राऊतर, मनोज चौगुले व परवेझ राऊतर यांनी संगनमताने फिर्यादी खोत यांच्या ट्रॅव्हलिंग व्यवसायाच्या महाराजा ट्रॅव्हल्सच्या अधिकृत ट्रेडमार्क लोगोचा, नावासह ई-मेल आयडीचा,व्यावसायिक पत्ता, कॉन्ट्रॅक्ट नंबरचा परवानगीशिवाय परस्पर वापर करण्यात आला आहे. ट्रव्हर्ल्सवर नावाचा वापर करून एव्हाना कंपनीच्या नावाचे स्टिकर लावून प्रवाशांची फसवणूक करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे, असेही तपास अधिकार्‍यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT