कोल्हापूर

महापुरावेळी कायमस्वरूपी मदत, पुनर्वसनाबाबत ठोस निर्णय घेऊ : राधाकृष्ण विखे-पाटील

Arun Patil

वारणानगर : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील शेकडो गावांना महापुराचा फटका बसतो त्यावेळी दरवर्षी हजारो लोकांना शाळा-मंदिरात सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे लागते. याबाबत कायमस्वरूपी मदत व पुनर्वसनाबाबत ठास निर्णय घेण्याची ग्वाही महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली

मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी वारणानगरला भेट दिली. आमदार डॉ. विनय कोरे यांनी त्यांचे कारखाना विश्रामगृहावर स्वागत केले. त्यानंतर त्यांनी सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले. यावेळी त्यांनी तात्यासाहेबांच्या सहकार शिल्पाविषयी माहिती जाणून घेतली.

खासदार धनंजय महाडिक, आमदार कोरे व जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी वारणापासून नजीक असणार्‍या नीलेवाडीसह अन्य गावांना महापुराचा विळखा बसतो याविषयीची माहिती आमदार कोरे व कार्यकर्त्यांनी दिली. यावर मंत्री विखे-पाटील म्हणाले, कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त गावांना महापुराचा फटका बसतो. पर्यायाने शेतीसह घरांच मोठे नुकसान होते. याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिली.

यावेळी वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे यांनी वाठार येथे मंडल अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम व्हावे व जिल्ह्यातील 889 पोलीसपाटील पदे रिक्त आहेत. ती भरण्यात यावी, अशी मागणी केली. संचालक प्रदीप देशमुख यांनी सध्या नवे पारगाव, जुने पारगाव व नीलेवाडी या 3 गावांसाठी एकच तलाठी व पोलिस पद आहे हे गैरसोयीचे असल्याने या तीन गावांसाठी 3 तलाठी व 3 पोलिसपाटील पदे निर्माण करावीत, अशी मागणी केली. राजवर्धन मोहिते यांनी घुणकी येथे तलाठी कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी आपत्कालीन व्यवस्थापनातून निधी मिळावा व पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासकीय गायरानातील जमीन मिळावी, अशी मागणी केली. याशिवाय वारणा परिसरातील कार्यकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन दिले.

SCROLL FOR NEXT