कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : पर्यटनाविषयी पर्यटकांच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारे, ऑस्ट्रेलियापासून युरोपपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, जगभरातील भ्रमंतीच्या पर्यायांची माहिती देणारे 'पुढारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स'चे यंदाही प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. दै. 'पुढारी' आणि 'टोमॅटो एफ.एम.' यांच्यातर्फे आयोजित प्रदर्शनाचे गगन टूर्स हे मुख्य प्रायोजक आहेत. 20 ते 22 ऑगस्ट या कालावधीत बसंत-बहार रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत हे प्रदर्शन पार पडत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, पर्यटनाविषयी सर्व माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
अमेरिका, जपान, युरोप, थायलंड, सिंगापूरसह जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, गुजरात येथील भटकंतीचे विविध पर्याय, उत्कृष्ट ठिकाणे पर्यटनप्रेमींना जाणून घेता येणार आहेत. यामध्ये विविध टूर्स पॅकेजेसचे अनेक पर्याय देणार्या कंपन्या सहभागी आहेत. तीन दिवस चालणार्या या प्रदर्शनात देशभरातील विविध स्टेट टुरिझम, विदेश पर्यटनाविषयी सगळी माहिती देणारे स्टॉल, असे नवनवीन भटकंतीचे पर्याय हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण आहेत. प्रदर्शनात पर्यटनाची हजारो ठिकाणे, तेथील अनुभव अशा अनेक गोष्टींची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत.
यासोबतच प्रदर्शनात विविध टूर्स कंपन्यांकडून दिल्या जाणार्या विशेष सवलती, नवनवीन पॅकेजेस याबाबची माहिती दिली जाणार आहे. प्रदर्शनात स्थलदर्शन, मनोरंजन, तीर्थस्थळ या पर्यटनस्थळांबरोबरच नयनरम्य डेस्टिनेशन, इव्हेंट लोकेशन व सामाजिक पर्यटनाची माहिती मिळू शकेल तसेच विविध ट्रेक्स आणि क्रुझेसविषयीही माहिती जाणून घेता येणार आहे.
* कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त होत पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे. देश-विदेशातील ऐतिहासिक वास्तू, तेथील खाद्यसंस्कृती, परंपरा, मनाला भुरळ घालणारा निसर्ग, नवनवीन प्रदेश याच्या सान्निध्यात जाऊन मन उल्हासित करण्याची नवीन संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात पर्यटन ही अत्यावश्यक गरज बनली आहे. या गरजेला योग्य मार्गदर्शनाची जोड लाभल्यास हा आनंद अधिकच द्विगुणीत होतो.
अधिक माहिती व स्टॉल बुकिंगसाठी संपर्क :
रिया (कोल्हापूर) : 8805021253, सनी (कोल्हापूर) : 9922930180, प्रणव (कोल्हापूर) : 9404077990 चंदन (पुणे) : 9881256084, बाळासाहेब (नाशिक) : 9765566411, अतुल (मुंबई) : 9820436956, परितोष (सांगली) : 8805007283.