कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महिलांच्या हक्काचे व्यासपीठ बनलेल्या दै. 'पुढारी'च्या कस्तुरी क्लबने कोरोनाच्या संकटातही महिलांना आर्थिक पाठबळ देत त्यांचा सर्वांगीण विकास साधला आहे. लॉकडाऊनच्या काळात एकत्र येण्यावर निर्बंध असतानाही सातत्याने ऑनलाईन कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांना सौंदर्य, आरोग्य, पाककृती अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी देण्यात आली. आताही अशा ऑनलाईन उपक्रमांसोबतच अनेक प्रकारच्या प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी सुरू झाली असून, लवकरात लवकर नावनोंदणी करावी, असे आवाहन कस्तुरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.
नोंदणीसोबत शहर आणि परिसरातील महिला व युवतींना हमखास गिफ्ट व भरपूर सवलत कूपन्सचा लाभ मिळणार आहे. याशिवाय सभासद महिलांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांच्या मेजवानीसह भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. नोंदणीसाठी 600 रुपये हे नाममात्र शुल्क आकारले जाणार असून, नोंदणीवेळी लगेचच ईझी स्पिन मॉप हे हमखास गिफ्ट महिलांना देण्यात येणार आहे.
नावनोंदणीसाठी टोमॅटो एफ एम, वसंत प्लाझा, 5 वा मजला, राजाराम रोड, बागल चौकजवळ येथे किंवा 0231 – 2533943 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.