कोल्हापूर

‘पुढारी’ एज्युदिशा ऑनलाईन 2021 भव्य शैक्षणिक प्रदर्शनाचे आज उद्घाटन

अमृता चौगुले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : 'पुढारी' एज्युदिशा ऑनलाईन 2021 या शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचे शनिवार (दि. 7) रोजी शानदार उद्घाटन होणार आहे.

करिअर संदर्भातील माहितीचा खजिना आणि शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन वाटा यासंदर्भात मार्गदर्शन करणार्‍या संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तूत- 'पुढारी' एज्युदिशा ऑनलाईन 2021 या शैक्षणिक प्रदर्शन आणि वेबिनार मालिकेचे शनिवार (दि. 7) रोजी शानदार उद्घाटन होणार आहे. नामवंत शैक्षणिक संस्थांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे.

प्रदर्शन विनामूल्य असणार

प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे तर सहप्रायोजक डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ पुणे व पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट पुणे हे आहेत. 7 ते 9 ऑगस्ट या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे.

दै.'पुढारी'च्या वतीने 2009 पासून 'पुढारी एज्युदिशा' शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांकरिता यंदा प्रथमच ऑनलाईन स्वरूपाचे राज्यस्तरीय प्रदर्शन घेण्यात येत आहे.

10 वी आणि 12 वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे शिक्षणांची अनेक दालने असतात. विद्यार्थी व पालक करिअरची दिशा ठरविण्याविषयी योग्य पर्यायाच्या शोधात असतात.

अशावेळी विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय ठेवून त्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन व्हावे, या हेतूने दै. 'पुढारी'ने 12 वर्षांपूर्वी एज्युदिशा शैक्षणिक प्रदर्शनाची सुरुवात केली.

दरवर्षी प्रत्यक्ष होणारे हे प्रदर्शन कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ऑनलाईन पद्धतीने होत आहे.

एका क्लिकवर पहा व्याख्यान

व्याख्यानांच्या दालनावर क्लिक केल्यावर त्यावेळेस सुरू असलेल्या अथवा होऊन गेलेले व्याख्यान विद्यार्थी, पालकांना पाहावयास मिळणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 प्रदर्शनाची वेळ असणार आहे.

तसेच विद्यार्थी व पालकांना प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी 'क्यूआर कोड' स्कॅन करून विनामूल्य नोंदणी करता येणार आहे.

हे प्रदर्शन मोबाईल, पी.सी, लॅपटॉप, इंटरनेट यासह स्मार्ट टी.व्ही.च्या माध्यमातून एकत्रित घरबसल्या तज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे.

विद्यार्थी व पालकांना मिळणार त्यांच्या प्रश्नांची उत्तरे…

प्रदर्शनात नामांकित, मान्यताप्राप्त विद्यापीठे महाविद्यालये व कोचिंग क्लासेस स्टॉल्स यांचा समावेश असणार आहे. यामुळे विद्यार्थी व पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे नामांकित संस्थांचे कौन्सलर व तज्ज्ञांकडून घरबसल्या कॉल, चॅट व व्हिडीओ कॉलद्वारे मिळणार आहेत. अग्रगण्य शिक्षणतज्ज्ञ, मोटिव्हेशनल स्पीकर यांचे लाईव्ह वेबिनार यांच्या माध्यमातून शिक्षणामधील न्यू रिअ‍ॅलिटी समजून घेता येणार आहे. अ‍ॅग्रीकल्चर, एव्हिएशन, हॉटेल मॅनेजमेंट, अ‍ॅनिमेशन, नर्सिंग, होमिओपॅथी, फायर इंजिनिअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी डिस्टन्स लर्निंग, स्पर्धा परीक्षा, आर्टस्, कॉमर्स, सायन्स विषयांबद्दलच्या माहितीचा प्रदर्शनात समावेश असणार आहे.

अधिक महितीसाठी 9545327545 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

असे पाहता येईल एज्युदिशा प्रदर्शन

प्रदर्शनात दरवर्षीप्रमाणे निरनिराळ्या विद्या शाखांची 35 हून अधिक दालने आहेत.

www.pudhariexpo.com या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर प्रदर्शनात सहभागी होता येणार आहे.

यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

रजिस्ट्रेशन केल्यानंतर प्रदर्शन हॉल व लेक्चर हॉल असे दोन पर्याय असतील.

यात प्रदर्शन हॉलमध्ये शैक्षणिक संस्थांचे स्टॉल दिसतील.

त्यामध्ये विविध शिक्षण संस्थांची माहिती, व्हिडीओ तसेच इतर माहिती मिळेल.

त्याचबरोबर संबंधित शिक्षण संस्थेस ऑडिओ व व्हिडीओ कॉल करता येणार आहे.

एज्युदिशा व्याख्यानाचे वेळापत्रक

पहा व्हिडिओ : महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT