कोल्हापूर

पर्यटन विकासासाठी स्थानिकांचा सहभाग आवश्यक

स्वालिया न. शिकलगार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासाच्या वारशासह धार्मिक-सांस्कृतिक, कला-क्रीडा, पर्यावरण, खाद्य यांसह विविध वैशिष्ट्यांनी कोल्हापूरचे पर्यटन परिपूर्ण आहे. यामुळेच कोल्हापूर हे जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. भविष्यात 'पर्यटन नगरी' म्हणून कोल्हापूर विकसित होऊ शकते. यासाठी स्थानिकांच्या सहभागातून पर्यटन विकासाला चालना देणे काळाची गरज आहे, असे मत हॉटेलमालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर व गगन टूर्सच्या व्यवस्थापकीय संचालिका नंदिनी खुपेरकर यांनी व्यक्त केले.

दै. 'पुढारी' संचलित प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या वतीने 'जागतिक पर्यटन' दिनानिमित्ताने 'वैभव महाराष्ट्राचे, उद्दिष्ट पर्यटन विकासाचे' या विषयावरील मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. कसबा बावडा येथील राजर्षी छत्रपती शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस) येथे सोमवारी हा ऑनलाईन उपक्रम झाला.

नागेशकर म्हणाले, पर्यटन विकास आराखडा तयार करताना सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे. पर्यटनावर आधारित पूरक उद्योगांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यातून रोजगारनिर्मिती होऊन पर्यटनवृद्धी साधता येईल. नंदिनी खुपेरकर म्हणाल्या, पर्यटकांना रस्ते, पाणी, स्वच्छतागृहे यांसारख्या मूलभूत सुविधांसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यासाठी शासकीय योजनांसह डिजिटल तंत्रज्ञानाचे पाठबळ गरजेचे आहे.

'हेरिटेज कोल्हापूर' उपक्रम अभिनंदनीय

दै. 'पुढारी'च्या वतीने 'हेरिटेज कोल्हापूर' या उपक्रमांतर्गत यू-ट्यूब चॅनेलवर र्(िीवहरीळ ेपश्रळपश) कोल्हापुरातील वास्तू, गडकोट-किल्‍ले, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा -चित्रपट परंपरा यावर आधारित चित्रफितींचा संग्रह तयार करण्यात आला आहे. हा संग्रह पर्यटकांना मार्गदर्शक ठरणारा असल्याचे नागेशकर यांनी आवर्जून सांगितले.

'हेरिटेज कोल्हापूर' उपक्रम अभिनंदनीय

दै. 'पुढारी'च्या वतीने 'हेरिटेज कोल्हापूर' या उपक्रमांतर्गत यू-ट्यूब चॅनेलवर र्(िीवहरीळ ेपश्रळपश) कोल्हापुरातील वास्तू, गडकोट-किल्‍ले, ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा -चित्रपट परंपरा यावर आधारित चित्रफितींचा संग्रह तयार करण्यात आला आहे. हा संग्रह पर्यटकांना मार्गदर्शक ठरणारा असल्याचे नागेशकर यांनी आवर्जून सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT