कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दैनिक 'पुढारी' व पिंपरी -चिंचवड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी (दि. 9) आयोजित केलेले व्याख्यान पुढे ढकलण्यात आले आहे. कोल्हापुरातील सद्यस्थिती पाहता आज शाहू स्मारक भवन येथे 12 वी विद्यार्थ्यांसाठी 'करिअर निवड व मार्गदर्शन' या विषयावर होणारे व्याख्यान रद्द केले आहे. व्याख्यानाची बदललेली तारीख आणि वेळ दै. 'पुढारी'मधून लवकरच जाहीर करण्यात येईल. याची नोंद विद्यार्थी, पालकांनी घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.