कोल्हापूर

दै. ‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलची जय्यत तयारी सुरू

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूरकर ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो खाद्य आणि खरेदीचा महोत्सव अर्थात दै. 'पुढारी' शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल 2022 दि. 23 पासून सुरू होत आहे. मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली आणि तेही पाच दिवस मिळणार आहे. विविध प्रकारच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासोबत फेस्टिव्हलमधील विविध वस्तू चोखंदळ खरेदीला साजेशा अशाच असणार आहेत. शाहूपुरी येथील आयर्विन ख्रिश्चन ग्राऊंड येथे मंगळवार (दि. 27) अखेर आयोजित करण्यात आला आहे. रॉनिक स्मार्ट वॉटर हिटर हे सहप्रायोजक म्हणून लाभले आहेत.

फेस्टिव्हलमध्ये काय खरेदी कराल?

शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये कॉस्मेटिक्स, ज्वेलरी, गिफ्टस्, टॉईज, फर्निचर आणि होम डेकॉर, गारमेंटस्, फूड प्रॉडक्टस्, नॉव्हेल्टीज, होम अप्लायन्सेस, खाद्यपदार्थ, गिफ्टस् यांचे स्टॉल्स कोल्हापूरकरांसाठी उपलब्ध होणार आहेत. तसेच, खास गृहसजावटीमध्ये चादरी, पडदे, फ्लॉवर पॉटस्, फ—ेम, आर्टिफिशियल फुले समावेश आहेत. सोफा, किचन अप्लायन्सेस अशा गोष्टींचा तर खजिनाच आहे. महिला व युवतींसाठी कपडे, दागिने, सौैंदर्यप्रसाधने, फुटवेअर असे असंख्य प्रकार बघायला मिळतील. तसेच लहान मुलांसाठी कपडे, खेळणी, पुस्तके आदींचाही समावेश आहे.

खाद्यमेजवानी काय असणार?

अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, फिश थाळी, तंदूर, कबाब, दम बिर्याणी, चिकन 65, चौपाटी पदार्थ, दाबेली, साऊथ इंडियन पदार्थ, थालीपीठ, मोमोज, फास्टफुडस्, थंड पेये, कस्टर्ड आणि आईस्क्रिम अशा चविष्ट आणि प्रत्येकाच्या आवडीच्या पदार्थांची मेजवानी खवय्यांना मिळणार आहे. फेस्टिव्हलमध्ये होलसेल भावात किरकोळ खरेदी करता येणार आहे. होलसेलर, मॅन्युफॅक्चरकडून वस्तूंची थेट खरेदीची संधी येथे मिळणार आहे. आकर्षक बक्षिसे, ऑफर्स, लाईव्ह डेमो यामध्ये असणार आहेत. याचबरोबर खाण्याचा आनंद देणारा फूड फेस्टिव्हलही सोबतीला असणार आहे. लहानग्यांना अ‍ॅम्युजमेंट पार्कची धमाल अनुभवता येणार आहे.

महिलांमध्ये प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याची क्षमता असते, मात्र त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. अशा महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबच्या वतीने 'मिस अँड मिसेस सौंदर्यवती' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. खास कस्तुरी क्लब सभासदांसाठी मिस कस्तुरी आणि मिसेस कस्तुरी फॅशन शो होणार असून दि. 19 ते 21 अखेर फॅशन शो ग्रुमिंग आणि 22 डिसेंबरला टॅलेंट राऊंड होणार आहे. कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी 16 डिसेंबर सायंकाळी 4 वाजेपर्यंत 8605095112 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

स्टॉल बुकिंगसाठी संपर्क :
प्रणव-9404077990,
युवराज-9156742221,
सनी-9922930180.
फूड स्टॉल करीता संपर्क :
दिपा-8805007724

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT