कोल्हापूर

देसाई – अडकूरकर व नायकवडी विवाह संपन्‍न

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : स्व. श्रीमंत प्रदिपराव देसाई-अडकूरकर व श्रीमती गितांजली देसाई-अडकूरकर यांचे द्वितीय सुपुत्र चि. रविंद्र यांचा विवाह चि. सौ. कां. अनुभूती (पद्मभूषण क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांची नात, स्व. अरुण नागनाथ नायकवडी यांची ज्येष्ठ कन्या व वैभव नागनाथ नायकवडी यांची पुतणी) हिच्याशी हॉटेल सयाजी येथे मोठ्या थाटात संपन्‍न झाला. यावेळी सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्रांतील मान्यवरांनी वधुवरांना आशीर्वाद दिले.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, खा. संजय मंडलिक, आ. पी. एन. पाटील, आ. मानसिंगराव नाईक, आ. अरुण लाड, आ. जयंत आसगावकर, आ. गोपिचंद पडळकर, आ. राजेश पाटील, आ. जयश्री चंद्रकांत जाधव, माजी खा. निवेदिता माने, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, मा.आ.संध्यादेवी कुपेकर, गंधालीदेवी कुपेकर, सरोज पाटील (माई), गोकुळचे संचालक विजयसिंह मोरे, मा. आ. डॉ. सुजित मिणचेकर, अभयसिंह देसाई-अडकूरकर, अजितसिंह देसाई-अडकूरकर, निवृत्त पोलिस आयुक्‍त गुलाबराव पोळ, किरण नायकवडी, गौरव नायकवडी, श्रीनिवास घाडगे (पोलिस उपायुक्‍त, पुणे), प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, संग्रामसिंह कुपेकर, अ‍ॅड. इंद्रजित चव्हाण, अ‍ॅड. सरिता राजेभोसले, वेदांतिका धैर्यशील माने, अ‍ॅस्टर आधारचे संचालक डॉ. अमोल कोडोलीकर, डॉ. मंजुश्री परदेशी, अजितसिंह मोहिते, विजय नार्वेकर, गणपतराव यादव, वैभव शिंदे, सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील, संचालक सत्यजित देशमुख, भगवानराव साळुंखे, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सोनिया सुहास बाबर, अपूर्णा संग्रामसिंह देशमुख, उद्योजक मयुरेश पाटील, डॉ. हेमंत पडिया, वैशाली कदम, सांगली जि. प.च्या माजी अध्यक्षा प्राजक्‍ता कोरे, वसंत भोसले, मिनाक्षी महाडिक, समित कदम आदी मान्यवर या सोहळ्यास उपस्थित होते. उद्योगपती संजयजी घोडावत यांनीही शुभसंदेश दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT