कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील दाभोळकर कॉर्नर-सासने ग्राऊंड रोडवरील रॉयल प्लाझामधील ज्युपिटर हॉस्पिटलचे उद्घाटन दै. 'पुढारी'चे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते सोमवारी झाले. डॉ. प्रवीणकुमार कारंडे, डॉ. ऋतुजा कारंडे प्रमुख उपस्थित होते. डॉ. कारंडे दाम्पत्याने ज्युपिटर हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यांच्यासह त्यांचे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ डॉक्टर्स रुग्णांना सर्वोत्तम सेवा देण्यास सज्ज आहेत, असे डॉ. जाधव यांनी सांगितले.
डॉ. जाधव म्हणाले, सर्व प्रकारच्या चाचण्या, तपासण्या आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांकडून उपचार या सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे. कोल्हापूरच्या वैद्यकीय सेवेत या हॉस्पिटलच्या रूपाने आणखी एक रुग्णसेवेचे दालन खुले झाले आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक हुबेकर, दाभोळकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अरविंद मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती आशा काळे-नाईक, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉ. अगतराव यादव, दत्तात्रय कारंडे, जयश्री कारंडे उपस्थित होते.